७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त होणार..

ई ग्राम : राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात करोनाची लागण १२६ जणांना झाली आहे. या पाठोपाठ केरळमध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आतापर्यंत १०९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देशातील करोना वाढता प्रसार पाहून संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आतापर्यंत देशभरातील करोनाबाधितांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहविभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ६० तुरुगांतील जवळपास ११ हजार कैदांना तातडीने पारोल देण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पारोल देण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला नव्हता. यापैकीच एक सिंधुदुर्ग जिल्हा होता. मात्र आता सिंधुदुर्गात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कणकवली येथील नागरिकाला करोनाची लागण झाली आहे.

Read Previous

गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रीचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर वापरावा – आमदार सुनील शेळके

Read Next

राज्यातील बेघर तसेच स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ मदत करण्याची मागणी