सोयाबीनला ११ हजार दर; जाणून घ्या बाजारभाव

Smiley face < 1 min

हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार मार्केट) यंदाच्या (२०२१) हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. आज गुरुवारी (ता.९) सोयाबीनला कमाल ११०२१ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात २ लाख ५७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यात पेरणी केलेल्या, तसेच लवकर काढणीस येणाऱ्या जेएस ९३०५ या वाणाच्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता.९) एकांबा (ता. हिंगोली) येथील शेतकऱ्याने ३ क्विंटल सोयबीनला जाहीर लिलावात प्रतिक्विंटल ११०२१ रुपये दर मिळाला.

egram
वाचा:  ‘अतिवृष्टीपेक्षाही वीज पुरवठा खंडीत करण्याचे संकट मोठे’

दरम्यान, हिंगोली बाजार समितीत गुरुवारी (ता.२) सोयाबीनची ५५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ९००० रुपये, तर सरासरी ८५०० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.४) १८ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल किमान ८८०० ते कमाल ९१०५ रुपये, तर सरासरी ८९५२ रुपये दर मिळाले अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाचा:  मिरची पिकावर ‘या’ नवीन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App