The Minister of State for Commerce & Industry (Independent Charge), Smt. Nirmala Sitharaman addressing a press conference, in New Delhi on October 14, 2016.

उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

ई ग्राम : कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन ची स्थिती असल्याने मोदी सरकारने शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या असून शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने देशासाठी एकूण १ लाख ७० हजार कोटी कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये देण्यात येणार असून यामुळे जनमानसाला दिलासा भेटणार आहे. याच मायक्रोइम्प्लिमेंटेशन आवाहन सरकारपुढे असणार आहे. याशिवाय उज्वला योजने अंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलिंडर भेटणार आहे. कोरोनाच्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका , युरोपियन देशानी खूप मोठी रक्कम या साठी ओतली आहे. आपल्या देशात सुद्धा अशी मागणी जनता आणि अर्थतज्ज्ञ करत होते. काँग्रेसचे नेते नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात आग्रही मागणी केली होती.

अर्थमंत्र्यांच्या काही महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे ! -केंद्र सरकारकडून गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं पॅकेज. कष्टकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा.
-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा
-आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० लाखांचा आरोग्य विमा. २० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार इंशुरन्सची सेवा
-प्रत्येक गरिबाला ३ महिने ५ किलो अन्नधान्य मोफत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जाणार. अर्थमंत्र्यांची घोषणा
-शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपयांची मदत
-मनरेगाच्या ५ कोटी मजुरांना योजनेचा लाभ
विधवा, दिव्यांगांना १ हजार रुपये देणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. ३ कोटी वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना मदत.अर्थमंत्र्यांकडून जनधन खातेधारक महिलांसाठीही मदतीची घोषणा
-नागरिकांनी विशेषत: गरीबांनी अन्न, धान्य आणि गॅस अर्थात इंधन पुरवठ्याची चिंता करु नये.
-उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

Read Previous

शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये तर गरिबांना मोफत गॅस – अर्थमंत्री

Read Next

जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकाने याबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा