शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३८ लाख जमा

Smiley face < 1 min

हिंगोली – अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी गुरुवार (दि.१२) पर्यंत १ लाख २७२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३८ लाख ३० हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांच्या २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ७१८ रुपये निधीची मागणी केली. परंतु, पहिल्या टप्प्यात १ कोटी १४ लाख ९८ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी तालुक्यांना निधी वितरित करण्यात आला.

egram
वाचा:  आनंदाची बातमी! राज्यात १५ ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू

सोयाबीनचे २ लाख ४४९ हेक्टर, कपाशीचे २१ हजार ४३२ हेक्टर, ज्वारी १ हजार ८७८ हेक्टर, मूग १ हजार ४१४ हेक्टर, उडदाचे १ हजार ५२० हेक्टरचे नुकसान झाले. या पिकांच्या नुकसानीची मदत देण्यासाठी एकूण १५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची मागणी करण्यात आली.

दरम्यान, बागायती क्षेत्रातील पिकांमध्ये ८७६ शेतकऱ्यांच्या २२५ हेक्टरवरील हळदीचे नुकसान झाले. ३० लाख ४५ हजार ३३० रुपये निधीची मागणी करण्यात आली. एकूण २०७ शेतकऱ्यांच्या १४२ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी २५ लाख ६० हजार ५०० रुपये निधीची मागणी करण्यात आली.

वाचा:  गुजरातमध्ये 'भूपेंद्र' पर्वाला सुरुवात

अनुदान वाटप (निधी लाख रुपये)
तालुका    प्राप्त निधी     वाटप शेतकरी संख्या…   वितरित निधी…  टक्केवारी

हिंगोली       १८.७३             १९९६२               ७.४९         ३९.६८
कळमनुरी     २६.१५              ९२५०               ५.२५          २०.०८
वसमत       २५.०४             २१५६४               ७.५०          २९.९५
औंढा नागनाथ  २३.०९            २३१६५               १०.३८         ४०.९६
सेनगाव       २१.९              २६३३१               ७.६८          ३४.९५

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App