कोल्हापूर, सांगलीतील ४४ गावे वीज बिल थकबाकीमुक्त; ‘या’ गावाचा पहिला नंबर

Smiley face < 1 min

कोल्हापूर : मार्च अखेर महावितरणच्या थकबाकी वसूली मोहिमेस वीज ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४४ गावे वीज बिलाच्या थकबाकीतुन मुक्त झाली आहेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लज विभागात सर्वाधिक ३६ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विभागात ७ गावांचा समावेश असलेले मांगले हे पहिले थकबाकीमुक्त शाखा कार्यालय ठरले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील चिमणे, झुलपेवाडी, करपेवाडी, हालेवाडी, होन्याळी, बेलेवाडी, महागोंडवाडी, चव्हाणवाडी, पेंढारवाडी, कागिनवाडी, हंदेवाडी, दर्डेवाडी, माद्याळ, मेढेवाडी ही १४ गावे थकबाकी मुक्त झाली आहेत.

चंदगड तालूक्यातील शेवाळे, खामदळे, शिरोली, सत्तेवाडी, मोरेवाडी, मलगेवाडी, विंझणे, बोंजूर्डी, अलबादेवी, उत्साळी, महिपाळगड, मुरकुटेवाडी ही १२ गावे तर गडहिंग्लज तालूक्यातील हासूर सासगिरी, वैरागवाडी, सावंतवाडी, जांभुळवाडी, हेळेवाडी, लिंगनूर, दुगूनवाडी, तारेवाडी, चंदनकुड, उंबरवाडी ही १० गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

या गावातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १७६९ ग्राहकांनी २० लक्ष १७ हजार रूपये थकबाकी भरणा केली आहे. गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता दयांनद कमतगी (आजरा), विशाल लोधी (चंदगड), संदिप दंडवते (नेसरी), सागर दांगट (गडहिंग्लज) यांनी कामकाज पाहिले. कदमवाडी उपविभागातील आंबेवाडी शाखेतंर्गतचे निटवडे (ता.करवीर) या गावातील १२० ग्राहकांनी ५ लक्ष रूपयांचा भरणा केला आहे.

दरम्यान, कार्यालयाने कार्यक्षेत्रातील मांगलेसह देववाडी, लादेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, चिमटेवाडी आणि पवारवाडी या ७ गावातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक १५८४ ग्राहकांनी ५६ लक्ष ७९ हजार रूपयांचा वीज बिल भरणा केला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App