हळदीला क्विंटलला ६ हजारांचा दर

Smiley face < 1 min

नवी दिल्ली – मंगळवारी सर्वच बाजारपेठांमध्ये हळदीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. केवळ २ हजार ११ बॅग विक्रीसाठी बाजारात आल्या होत्या. व्यापाऱ्यांकडून चांगल्या प्रतिच्या हळदीची खरेदी करण्यात आली. विक्रीसाठी आलेल्या एकूण हळदीपैकी ६८ टक्के हळदीची विक्री झाली. हळदीच्या किंमतीत वाढ झाली असली तरी गुणवत्तेच्या आधारेच खेरदी केली जात असल्याची माहिती इरोड हळद व्यापारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आर. के. व्ही. रविशंकर यांनी दिली.

हळदीच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात झाली आहे. व्यापारी चांगल्या प्रतीच्या हळदीची वाट पाहत आहेत. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आता तेथून हळदीची मागणी कमी झाली आहे. इरोड हळद व्यापारी संघटनेच्या विक्री यार्डात हळद ५ हजार ११९ ते ६ हजार ३२९ रुपये क्विंटलला विकली गेली. मूळ वाण ४ हजार ६२९ ते ५ हजार ६३९ रुपये क्विंटलला विकले गेले. इरोड को-ऑपरेटिव्ह मार्केटींग सोसायटीमध्ये हळद ५ हजार २९७ ते ५ हजार ८९९ प्रति क्विंटल दराने विक्री करण्यात आली. मूळ वाणाला ४ हजार ८९१ ते ५ हजार ७६९ प्रतिक्विंटल दर मिळाला. विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व ४७० पिशव्यांची विक्री
करण्यात आली.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App