९ पंखे, ८ बल्ब, पाण्याची मोटर, कुट्टी चालूनही विजबील मात्र ‘शुन्य’

Smiley face 2 min

ई ग्राम टीम :  हरियाणाच्या डोभ या गावात राहणाऱ्या ४७ वर्षीय नरेंद्र कुमार यांनी दीड वर्षांपूर्वी आपली दुग्धशाळा सुरू केली. त्यांचा संपूर्ण परिवार शेतकरी असून ते शेती करतात. काही वर्षांपूर्वी त्यांना समजले की शेतकर्‍यांना मिळणारा फायदा हा मिश्र किंवा एकात्मिक शेतीत आहे. यावर त्यांनी स्वत:चा डेअरी फार्म सुरू केला.

नरेंद्र कुमार सांगतात की, आमच्या घरात पहिल्यापासून पशुपालन केले जाते. त्यात आम्ही गाई आणि म्हैस मुख्यता पाळतो. सुरूवातीला असणाऱ्या जनावरांमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन गाय आणि म्हैस यांची खरेदी केली. यातून त्यांनी स्वत:चा डेअरी फार्म सुरू केला. डेअरी फार्म सुरू करताना त्यांना सरळ विचार ठेवला की केवळ स्वतःच्या उत्पन्नासाठीच नाही तर लोकांच्या आरोग्यासाठीही काम करावे लागेल. हरियाणाचे दूध आणि दही जगभरात प्रसिद्ध आहे,  पण अलीकडच्या काळात काही लोकांना स्वत:च्या फायद्यासाठी त्याचे लोभ कमी केले आहे.

यावेळी ते सांगतात की, “आपल्या प्राण्यांनी चांगले दूध द्यावे आणि पुढे आपल्याला चांगल्या दर्जाचे दूध आणि तूप निर्माण करायचे असेल तर आपण आपल्या जनावरांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जसं आपण आपल्या घरातील लहान बाळाची किंवा मुलांची काळजी घेतो तशी त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे.”

वाचा:  पुन्हा एक मराठा लाख मराठा; आंदोलनाला सुरूवात

त्यांच्या म्हणण्यानुसार, जनावरांची चांगली काळजी घेण्यासाठी त्यांनी शेतात सेंद्रिय पद्धतींनी हिरवा चारा वाढवण्यास सुरुवात केली. अल्प प्रमाणात जमीन व्यतिरिक्त ते गहू, धान, मका, मूग इत्यादी पिकांसाठी हिरव्या चारा व्यतिरिक्त पिकवतात. प्राण्यांचे अन्न, आहार आणि पोषण याची पूर्ण काळजी घेतल्यानंतरही नरेंद्र यांना काहीतरी कमतरता भासू लागली.

यावेळी सांगतात की, अन्न, खाद्य, पाणी इत्यादी ठीक आहेत, परंतु प्राण्यांनाही विश्रांतीची आवश्यकता आहे. विशेषत: उन्हाळ्यात. फॅन-कूलरशिवाय माणूस दोन क्षण जगू शकत नाही, तर प्राण्यांचा विचार करा. म्हणून नरेंद्र यांनी आपल्या प्राण्यांसाठी पंखे, पाणी इत्यादींसाठीही चांगली व्यवस्था केली आहे. पण विजेची समस्या होती.

वाचा:  फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, कारण...

विजेच्या समस्येवर नरेंद्र सांगतात, आमच्या गावात बऱ्याच दिवसांपासून विजेची मोठी समस्या आहे. दिवसात फक्त ४ ते ५ तास लाईट असते. यामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतो. त्याचबरोबर लाईट नसल्यामुळे पाण्याची मोटार आणि जनावरांसाठी चारा काटण्याची कुटीच चालत नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होती.

लाईटच्या समस्येबाबत मी खूप त्रस्त होतो. यावर काही जणांनी सौर ऊर्जा पॅनेल लावण्याचा सल्ला दिला होता. ते लावण्यानंतर सगळ्याच अडचणी दूर होणार होत्या. मग यावर सौर ऊर्जा पॅनेलची माहिती घेतली आणि डेअरी फार्ममध्ये लावले.

नरेंद्र यांनी डेअरी फार्ममध्ये ५ किलोवॅटचे इन्वर्टर आणि ३ किलोवॅट सौर पॅनेल लावले. यासाठी १ लाख ६० रूपये खर्च आला. आता त्यांच्या इथे ८ ते ९ पंखे, ७-८ बल्ब आणि ट्यूबलाईट, पाण्याची मोटार, चारा काटण्यासाठी कुटी मशिन हे त्यावर सतत चालते. नरेंद्र यांना सौरपॅनेल लावण्यासाठी फक्त एकदाच खर्च आला. सौर पॅनेल लावण्यानंतर त्यांच्या सगळ्या समस्या दूर झाल्या.

वाचा:  राज्यात पुढील ३ दिवसांत अतिवृष्टी; हवामान खात्याचा इशारा

या झालेल्या खर्चावर ते म्हणतात की, हा खर्च एकदाच करायचा होता. हे बसावल्यानंतर आम्हाला कोणतीच लाईटीची समस्या राहीली नाही. मागील चार महिन्यांत फक्त आमची १ युनिट लाईट जळाली आहे, ती पण ढगाळ हवामान असल्यामुळे. सौर पॅनेल लावण्याअगोदर मला ३ ते ४ हजार रूपये प्रतिमहिना विज बील येत होते. पण सौर पॅनेल लावण्यामुळे आता पूर्णपणे विज बील येणे बंद झाले. लाईटीची वाट पाहावी लागत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा जनावरांसाठी चाऱ्याची कुटी करू शकतो, त्यांना पाहीजे तेव्हा ताजे पाणी पाजू शकतो, आणि उकाड्यापासून त्यांना पूर्ण मुक्ती मिळाली त्यांच्यासाठी सतत फॅन सुरू असतात.  

दरम्यान, या सगळ्या पलिकडे ते सांगतात की, ज्या जनावरांमुळे मला महिन्याला ३ लाख रूपये मिळतात त्यांच्यासाठी मी एकदा खर्च करू शकत नाही का?  त्यांना सौरपॅनेल लावण्यासाठी कोणताच वायपट खर्च वाटत नाही. उलट ते सांगतात की सगळ्यांनी सौरपॅनेल लावले पाहिजेत. यामुळे येणार वीजेचा संपूर्ण खर्च वाचतो.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App