सौर पंपांसाठी ९० टक्के अनुदान; जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

ई ग्राम : किसान ऊर्जा सुरक्षा आणि उन्नती अभियान (कुसुम) योजनेंतर्गत केंद्र सरकारने सौर ऊर्जेसह देशभरात सिंचनासाठी वापरलेले सर्व डिझेल / इलेक्ट्रिक पंप चालवण्याची योजना आखली आहे. कुसुम योजना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2018-19 मध्ये जाहीर केली होती. २०२०-२०२१ च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्पांतर्गत २० लाख सौरपंपांना अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे डिझेल वापर आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर आळा बसेल.

कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होईल. एक, त्यांना सिंचनासाठी विनामुल्य वीज मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी अतिरिक्त वीज बनवून ग्रीडला पाठविली तर त्यातून त्यांचे उत्पन्न वाढेल. याशिवाय सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ १0% रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका 30 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. त्याच वेळी, सरकार सौर पंपच्या एकूण खर्चाच्या ६0% शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देईल.

कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
१) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://kusum.online/ वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा
३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता कुसुम सौर योजनेंतर्गत भरलेला फॉर्म जमा करा.

कुसुम योजना म्हणजे काय?
सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकर्‍यांना केवळ १0% रक्कम द्यावी लागेल.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करेल.
सौरऊर्जापंप नापीक जमिनींवर बसविले जातील.
कुसुम योजनेंतर्गत बँका ३0 टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील.
सौर पंपाच्या एकूण खर्चापैकी ६0% सरकार अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देईल.
कुसुम योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण https://mnre.gov.in/ वर भेट देऊ शकता.

आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्रायब करा आणि मिळवा शेतीविषयक सर्व अपडेट https://www.youtube.com/c/AgrowonEGram?sub_confarmation=1

Read Previous

थेट सरपंच निवड रद्द! दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

Read Next

कालवे “म्हैसाळ’च्या पाण्याच्या प्रतीक्षेत