सुएझ कालव्यातील अडकलेल्या जहाजाचा तिढा सुटला

Smiley face 2 min

नाशिक : इजिप्तमधील सुएझ कालव्यात मंगळवारी (ता.२३) वादळी वाऱ्यामुळे जगातील मोठे एव्हर गिव्हन कार्गो हे जहाज सरकून वाळूत काठालगत रुतले होते. ही समस्या सोडविण्यासाठी सुएझ कालवा प्राधिकरणाने प्रयत्नांची शिकस्त केली होती. कालव्याच्या वाहतूक मार्गात अडकून तिरके जहाज सरळ करण्यात यश आले आहे. मात्र वाहतूक कधी सुरळीत होते हे पाहणे अपेक्षित आहे.

सुएझ कालवा प्राधिकरणाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ८० टक्के अडचण दूर झाली आहे. मात्र कालव्यात पाण्याची पातळी वाढवून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे इतर जहाज हलवून सोमवारी (ता.२९) उशिरा वाहतूक सुरळीत होईल, असे बोलले जात आहे. जागतिक जल वाहतुकीच्या अनुषंगाने ही मोठी गंभीर समस्या बनल्याने शिपिंग उद्योगासमोर चिंता वाढली होती. मात्र तूर्तास दिलासा मिळाला आहे. सध्या छोटी जहाज पुढे जात असल्याचे समजते.

egram

हे जहाज कालव्याच्या कडेला रुतून गेल्याने रविवार (ता.२८)अखेर जहाजाच्या अडथळाच्या अंतरावरून बाजूंच्या १९३ कि.मी. मागील भागात ३६९ जहाजे अडकून पडले होती. अखेर १४ बोटींचा वापर करून अडकलेले जहाज खेचून ३० अंश डावीकडून उजवीकडे सरळ केले आहे. मात्र कालव्याच्या मध्यावर आल्यावर ते पुढे मार्गस्थ होणार आहे.

जागतिक व्यापारावर मोठा परिणाम
जगातील एकूण व्यापारापैकी १२ टक्के व्यापार या जलमार्गातून होतो. यापैकी एक दशलक्ष बॅरल इंधन तेल व ८ टक्के द्रवयुक्त नैसर्गिक गॅसची एक दिवसात वाहतूक होते. हा मोठा फटका मानला जात आहे. यासह शेतमालाचा विचार केल्यास वाहतुकीसाठी सुलभ मार्ग आहे. मात्र या अडचणीमुळे नाशिकमधील जवळपास २ हजार कंटेनर अडकल्याने त्यात द्राक्ष, कांदा अडकून पडला होता. त्यामुळे निर्यातदारांचा जीव टांगणीला होता. ही अडचण तूर्तास सुटली, मात्र पुढील बंदरावर एकदाच शेतमाल पोहचणार असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर दबाव वाढणार असल्याची भीती आहे.

जहाजाची स्थिती अशी
१) तैवानची एव्हर ग्रीन मरिन ही कंपनी हे जहाज चालवते.
२) जगातील सर्वात मोठे एव्हर गिव्हन हे कंटेनर जहाज आहे.
३) ४०० मीटर लांबी (१३१२ फूट) आणि २ लाख टन क्षमता.
४) त्यात सध्या १८,३०० कंटेनर असल्याचे समजते.

“मिळालेल्या माहितीनुसार अडकलेले जहाज अडचणीतून काढण्यात यश आले आहे. परंतु वाहतूक कधी सुरू होईल. याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही. मात्र लवकरच मार्गस्थ होईल असे समजते.”
विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नाशिक.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App