कौतुकास्पद! जामखेडच्या ‘या’ सुपुत्राने बनवलाय टाकावू वस्तूंपासून व्हेंटीलेटर

Smiley face 2 min

ई ग्राम : कोरोनाने सर्व जगात धुमाकूळ घातलेला आहे. भारतासह इतरही देश लॉकडाउन आहेत. सर्व इंडस्ट्री बंद आहेत. लोकांच्या हाताला काम नाही. कोरोनापासून लोकांचे जीव वाचवायचे असतील तर त्यासाठी सर्वात मोठी गरज आहे ती व्हेंटिलेटरची. नगर जिल्ह्यातील जामखेड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे ते शहर सील केले आहे. जे रूग्ण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते. त्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले. लोकांना क्वॉरंटाइन केलं की भीतीने त्यांची गाळण उडते. नवनिर्मिती किंवा नवविचार ही फार दूरची गोष्ट. मात्र, या वातावरणातही क्वॉरंटाइन केलेल्या एका युवकाने मोठं संशोधन केलं आहे. ज्याचा संपूर्ण देशाचा फायदा होऊ शकतो.

कोरोनाबाणीच्या परिस्थितीत या काळात देशाला व्हेंटिलेटरची कमी भासू शकते. त्या दृष्टीकोनातून या युवकाने ऑटोमॅटीक कन्टीन्यूस पॉझिटीव्ह एअरवे प्रेशर (CPAP) व्हेंटिलेटर तयार केले. यात नव्वद टक्के भंगार सामानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमी खर्चात ते उपलब्ध होऊ शकते असा त्याचा दावा आहे. काही विद्यूत उपकरने जे भंगारात नसतात ते कमी आहे जर हे पार्ट आपल्याला उपलब्ध झाले तर हे व्हेंटिलेटर अजून उत्कृष्टपणे काम करेल, असा त्याचा दावा आहे. या भयंकर परिस्थितीत लोकांच्या सेवेत आपले योगदान देता येईल, या प्रामाणिक भावनेतून मी माझी कल्पना प्रत्यक्षात उतरवली, असे सोहेल इब्राहिम सय्यद सांगतो.

वाचा:  फुटाने वाढले, इंचाने ओसरू लागले; कोल्हापुरात संथगतीने पाणी कमी

सोहेल विद्युत अभयांत्रिकीचा विद्यार्थी आहे. समाजसेवेची भावना त्याच्यात रुजू करणारे त्याचे मोठे चुलते इस्माईल भाई सय्यद जामखेड तलुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच वडील इब्राहिम सय्यद हे व्यावसायिक आहेत. भाऊ साहिल सय्यद हा फार्मसीचा विद्यार्थी आहे. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील नामांकित MNC मध्ये Job करून स्वतः उद्योजक होऊन लोकांना रोजगार निर्माण करून द्यावा, या भावनेतून विप्ज.इन (Wipz.in) या नावाने स्वतःच बांधकाम क्षेत्रात त्याने व्यवसाय सुरू केला. व्यवसायात चांगला प्रतसादही मिळाला. अवघ्या 3 महिन्यांत दिल्ली येथे बांधकाम क्षेत्रात उगवतं नेतृत्व म्हणून त्याला पुरस्कारही मिळाला.

वाचा:  धोकादायक गावांचे होणार सक्तीने पुनर्वसन - उपमुख्यमंत्री अजित पवार

सोहेलने बनविलेल्या या उपकरणाला ‘JIVA’ ( जीवन आणि वायु प्रदान करणारा ) हे नाव दिले आहे. या नावासोबत फक्त वैज्ञानिक भावनाच नव्हे तर महाराष्ट्राचे दैवत आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवणारे शूर सरदार जीवा महाले यांच्या नावाने प्रेरीत होऊन हे नाव दिल्याचेही सोहेल सांगतो.

जीवाची उपयुक्तता
सोहेल सध्या जामखेड शहरात होम क्वॉरंटाइन आहे. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. या व्हेंटिलेटरच्या संशोधनात काही सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी त्याला सुट्या भागांची आवश्यकता आहे. परंतु लॉकडाउनमुळे ती पूर्ण होत नाही. हे उपकरण नक्कीच उपयोगी पडेल. परंतु ते तज्ज्ञांपर्यंत ते पोहोचयला हवे.

वाचा:  धोकादायक गावांचे होणार सक्तीने पुनर्वसन - उपमुख्यमंत्री अजित पवार

रोहित पवारांमुळे सोहेल शोध उजेडात
होम क्वॉरंटाइन असल्याने सोहेलचा शोध जगापर्यंत आलेला नाही. त्याला या उपकरणात सुधारणा करायची आहे. परंतु तो होम क्वॉरंटाइन असल्याने आणि जामखेड शहर सील असल्याने प्रत्येकाला कोरोनाची भीती आहे. त्यामुळे कोणाचे सोहेलच्या या संशोधनाकडे लक्ष गेले नाही. आमदार रोहित पवार यांना सोहेलच्या संशोधनाची माहिती समजली. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर सोहेलच्या संशोधनाचे कौतुक करीत व्हिडिओ पोस्ट केला. आता सोहेलच्या मित्रांनीही ती पोस्ट शेअर केली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App