बळीराजाच्या कल्याणासाठी ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ कटिबध्द

Smiley face 2 min

पुणे – शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ ही पुरवठा साखळी सकाळ माध्यम समुहाने महाराष्ट्रात सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) या पुरवठा साखळीचा शुभारंभ सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते झाला. ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ शेतकऱ्यांच्या सर्व गरजा भागविण्यासाठी तसेच बळीराजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.

उदघाटनानंतर प्रातिनिधिक स्वरुपात अ‌ॅग्रोवन मार्ट’च्या पाच फ्रॅन्चाईझींचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अ‌ॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण आणि अ‌ॅग्रोवन अ‌ॅग्रोटेक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ उपस्थित होते.

वाचा:  कांदा बियाण्यांचा तुटवडा; दुप्पट पैसे देऊनही बियाणे मिळेना

यावेळी अभिजित पवार म्हणाले की, शेतकऱ्याला अद्याप सर्वांगीण स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मला वाटत नाही. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या, अडचणी आहेत. त्यांना या संकटातून सोडविण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलो आहोत. अ‌ॅग्रोवन हे वर्तमानपत्र सुरू करून त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले होते. आता त्याच्या पुढचे पाऊल अ‌ॅग्रोवन मार्टच्या रुपाने आम्ही टाकत आहोत. शेतीसाठीचा खर्च कमी कसा करता येईल आणि चांगला बाजारभाव शेतकऱ्याला कसा मिळू शकेल, या दिशेनेही आम्ही काम करत आहोत. कशाला प्राधान्य द्यायला हवे हे ‘कोविड-१९‘च्या संकटातून निसर्गाने आपल्याला शिकविले आहे. अ‌ॅग्रोवन मार्टद्वारे आम्ही शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील राहूणआर असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

वाचा:  क्युआर कोड स्कॅन करा अन् केळी खा बिनधास्त

‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ ही रिटेल पुरवठा साखळी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये आकाराला येत आहे. पहिल्या टप्प्यात १५८ तालुक्यांमध्ये ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ सुरू होत आहेत. ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.agrowonmart.com या संकेतस्थळाला भेट द्या.

काय आहे ‘अ‌ॅग्रोवन मार्ट’?

अ‌ॅग्रोवन मार्टच्या माध्यमातून शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी लागणारे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि अवजारांपासून दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंपर्यंत सर्व काही ‘ अ‌ॅग्रोवन मार्ट’मध्ये मिळणार आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि पशू वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांना जोडणारा दुवा म्हणूनही ‘ अ‌ॅग्रोवन मार्ट’ काम करणार आहे.

वाचा:  बाप रे! सात महिन्यात ३७६ शेतकऱ्यांना सर्पदंश

दरम्यान, अ‌ॅग्रोवनमधून शेतकऱ्यांना आवश्यक आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली जाते. अ‌ॅग्रोवनच्या पुढचे पाऊल म्हणजे अ‌ॅग्रोवन मार्ट. शेतीशी संबंधित पूर्ण ‘इकोसिस्टिम’ उभी करण्याचा आणि शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने सर्व पातळ्यांवरील सोई-सुविधा पुरविण्याचा आमचा मानस असल्याचे सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार म्हणाले. तर शेतकऱ्याच्या दारात समृद्धी घेऊन जाण्याचे उद्दीष्ट उराशी बाळगून अ‌ॅग्रोवनची वाटचाल सुरू आहे. त्यालाच जोडू शेतकऱ्याच्या गरजा तत्काळ भागवून त्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचा अ‌ॅग्रोवन ॲग्रोटेक इंडस्ट्रीजचा प्रयत्न राहील, असे अ‌ॅग्रोवन अ‌ॅग्रोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App