अॅग्रोवन डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. काळाची पाऊले ओळखून अॅग्रोवन यापुढील काळात डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणार आहे, असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले. अॅग्रोवन फेसबुक संवाद कार्यक्रमात रविवारी (ता ३१) ते बोलत होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अॅग्रोवनने सुरु केलेल्या फेसबुक संवाद कार्यकमाच्या पहिल्या टप्याची सांगता रविवारी झाली. त्यानिमित्ताने श्री. चव्हाण व अॅग्रोवन अॅग्रोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शेजवळ यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन, अॅग्रोवन आणि पुढची दिशा या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

अॅग्रोवन डिजिटलचा मुख्य भर मार्केट इंटेलिजन्सवर राहील असे श्री शेजवळ म्हणाले. अॅग्रोवन डिजिटलच्या माध्यमातून वेबसाईट, मोबाईल अॅप्लिकेशन, फेसबुक पेज, यू ट्यूब चॅनेल नव्या स्वरुपात विकसित करण्यात येणार आहेत. १५ जून पासून अॅग्रोवन यू ट्यूब चॅनेलवर मार्केट बुलेटीन, अॅग्रो बुलेटीन, मार्केट ट्रेंड, अॅग्रोवन कट्टा, एक्सप्लेनर व्हिडीओ, विशेष मुलाखती सादर केल्या जाणार आहेत. तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे फेसबुक लाईव्ह १५ जून पासून सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती श्री. निलेश शेजवळ यांनी दिली.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

बाजारात जे विकते, तेच पिकवण्याची मानसिकता यापुढे शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. बाजार व्यवस्थेमध्ये बदल होण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रासाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्राचे महत्व ठळकपणे अधोरेखित झाले आहेत. अॅग्रोवन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशा भावना श्री. आदिनाथ चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App