गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले, म्हणाले…

Smiley face < 1 min

सातारा :  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार संपातले आहेत. त्यांनी आज यावर प्रकरणावर भाष्य करत पडळकरांवर टिका केली आहे. ज्या नेत्यांच डिपॉझिट जप्त झालं, त्याविषयी काय बोलायचं, हा सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे, अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

वाचा:  मराठा आरक्षणाचा निर्णय विरोधात गेल्यास सरकारविरोधात आंदोलन, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्तीने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित होते. दरम्यान, दुपारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अजित म्हणाले की, “शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. ज्या माणसाची योग्यता नाही त्याने काय बोलावे. मोठा नेता असता तर गोष्ट वेगळी. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. म्हणजे तुम्ही ओळखू शकता. त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देऊ नये.”

वाचा:  पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

दरम्यान, आता बस, काही प्रमाणत रेल्वे, विमान सुरु झाले आहेत. केंद्र पण अनेक अटी शिथिल करत आहे. हेअर सलून पण सुरु होत आहे. काही करुन या संकटातून राज्याला बाहेर काढायचं आहे, असंही ते म्हणाले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App