अजित पवार राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत

Smiley face 2 min

पुणे – राज्यात सध्या ज्येष्ठ नेते ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सर्व प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बुधवारी शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्टरवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये एक बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत पक्ष प्रवेश देण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भाजपमधील एक मोठा गट सध्या फुटण्याचा मार्गावर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. या नेत्यांचा प्रवेश केव्हा घडवून आणायचा याची मोठी जबाबदारी शरद पावर यांनी अजित पवार यांच्यावर सोपविल्याची माहिती समोर येत आहे.

वाचा:  केंद्रीय मंत्री दिसतील तिथे कांद्याने झोडपू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून राजकीय व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना परत पक्षप्रवेश केव्हा आणि कसा द्यायचा याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीत असणाऱ्या तिनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून या सर्व नेत्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचे समजते आहे.

वाचा:  कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरसावले; केंद्राला पत्र पाठवत म्हणाले...

राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांचा प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेतले जाईल, असेही बोलले जात आहे.

एकीकडे भाजपचे नेते पार्थ पवार यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर टीका करत असतानाच राष्ट्रवादी ही व्यूहरचना आखत आहे. त्यामुळे आता भाजपला डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करावे लागणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असं जाहीररित्या सांगणार तर नाही ना! जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावं लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात.” असे भुजबळ म्हणाले.

वाचा:  साखर कारखान्यांचे अद्यापही शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचे देणे

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App