राज्याचे स्टेअरिंग कोणाच्या हातात?; अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Smiley face < 1 min
अजित पवार
राज्याचे स्टेअरिंग नेमके कोण्यचा हातात; अजित पवारांच्या मुख्यंत्र्यांना अनोख्या शुभेच्छा

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. रात्री बारा वाजता त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत मुख्यमंत्र्याचे अभिष्टचिंतन केले आहे.

अजित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अजित पवार एका गाडीमध्ये बसले आहेत. या गाडीचे सारथ्य खुद्द अजित पवार करत आहेत. दोघेही एकाच गाडीत बसले असताना महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टिअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.

वाचा:  प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले असतानाचा हा फोटो आहे. या फोटोमुळे तेव्हा राजकीय वातावरणात धुराळा उडाला होता. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामना दैनिकाला मुलाखत दिली होती. यावेळी आमचे सरकार तीन चाकी रिक्षा असली तरी त्याचे स्टेअरिंग व्हील माझ्या हातात असल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. मात्र, अजित पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे राज्याचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हातात उध्दव ठाकरे की अजित पवार? मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना अजित पवार यांनी नेमका हाच फोटो शेअर केल्याने पुन्हा या चर्चां रंगणार आहे.

वाचा:  राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपालांकडेच

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App