डमरजुला – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यात केवळ त्यांच्या भाच्यासाठीच काम करीत असून विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या बाजूने कोणीही नसेल, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रविवारी (दि.३१) केली.
डमरजुला येथे आज झालेल्या सभेत शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (टीएमसी) ‘मा माटी, मानुष’ या घोषणेचा खरा अर्थ पिळवणूक, भ्रष्टाचार आणि लांगूलचालन असा असल्याचे सांगून बंगालमध्ये पुढील सरकार भाजपचेच असेल आणि राज्यात विकासाचा मार्ग खुला होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
यावेळी शहा म्हणाले की, ‘‘निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. मोदी सरकार जनकल्याणासाठी काम करीत असताना ममता बॅनर्जी सरकार ‘भतिजा कल्याणा’साठी काम करीत आहेत.’’
ममता अपयशी
‘टीएमसी’चे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, त्याबद्दल ममता बॅनर्जी यांची आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला शहा यांनी दिला. ‘‘त्या राज्यातील जनतेसाठी अपयशी ठरल्या आहेत, हे याचे कारण आहे. निवडणुकीपर्यंत त्या एकट्या पडणार आहेत,’’ असेही ते म्हणाले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.