अमूल डेअरी उतरणार मध उत्पादनात

Smiley face < 1 min

अहमदाबाद – गुजरातची अग्रगण्य सहकारी डेअरी संस्था अमूलने डेअरी व्यतिरिक्त खाद्य तेल, बेकरी आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर आता मध उत्पादना क्षेत्रात उतरणार आहे. यातून अमूल बरोबर काम करणाऱ्या ३६ लाख दूध उत्पादकांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत तयार होणार आहे.

मध उत्पादनात शिरकाव करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा अडथळा म्हणजे मधाच्या तपासणीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा. मधाचा ब्रँड प्रस्थापीत करण्यासाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या प्रयोगशाळा गरजेच्या असतात. या प्रकारच्या प्रयोगशाळा उभारणे खूपच खर्चीक असते, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने जुलैमध्ये मध तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारली आहे. त्यामुळे आता अमूल मधाचा स्वतःचा ब्रँड सुरू करू शकते, असे सोधी म्हणाले.

वाचा:  राज्य सरकार अ‌ॅक्शन मोडमध्ये; मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी विनंती अर्ज

मध उत्पादनाची योजना आणि खरेदी यंत्रणेची आखणी अजून तयार होत असली. तरी उत्तर गुजरातमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी मध उत्पादन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना मध उत्पादक शेतकऱ्यांची प्रशंसा केली होती. यावेळी भारतात ‘गोड क्रांती’ होण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले होते. सहकार पद्धतीवर मध उत्पादन सुरू केल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि अमूल ही खाद्य पदार्थ उत्पादनात स्वतःचा मधाचा ब्रँड वापरू शकते. हा व्यवसाय सुरवातीला गुजरात पुरता मर्यादीत असाला तरी नंतर देश पातळीवर
याचा विस्तार केला जाईल.

वाचा:  अभुतपूर्व गोंधळात राज्यसेभेत कृषी विधेयक मंजूर

दोन दिवसांपूर्वी अमूलने १ हजार ५०० कोटी रुपये इतक्या गुंतवणूकीची योजना जाहीर केली होती. खाद्य तेल, बेकरी आणि बटाटा प्रक्रिया कारखाने सुरू करण्यासाठी ही गुंतवणूक येत्या २ वर्षात केली जाईल. एकूण गुंतवणुकीपैकी १ हजार कोटी रुपये डेअरी कारखाने सूरु करण्यासाठी वापरले जाणार आहेत. तर उरलेली रक्कम नव्या पदारर्थांसाठी वापरली जाईल. या गुंतवणुकीमुळे अमूलची दूध प्रक्रिया क्षमता प्रती दिवस ३८० लाख लिटर वरुन ४२० लाख लिटर इतकी होईल. तसेच अमुल खाद्य तेल विक्री ‘जन्मय’ या ब्रँडमार्फत होईल. अमूल सूर्यफूल, भुईमूग, मोहरी आणि सोयाबीन या तेलांची विक्री करेल.

वाचा:  अधिकारी साखर झोपेत तेव्हा अजित पवार फिल्डवर; ६ वाजताच केली मेट्रोच्या कामाची पाहणी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App