जालना : एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

Smiley face < 1 min
सोयाबीन शेती शाळा
जालना : एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

जालना – सर्व शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकामध्ये एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापनाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी शितल नागवडे यांनी केले. घुंगर्डे हादगाव येथे तालुका कृषी विभागाच्यावतीने सोयाबीन पिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नागवडे म्हणाले की, सापळा पिके, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे आणि जैविक किडनाशके यांचा एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वापर करून किड आणि रोग नियंत्रणावरील खर्चात बचत करावी. यावेळी कृषी सहाय्यक अशोक सव्वाशे म्हणाले, तूर, सोयाबिन अशी आंतरपिक पद्धतीमुळे मुख्य पिकाचा कालावधी जेवढा लांब असेल, त्या प्रमाणात तूर पिकाची उत्पादकता कमी होताना आढळते. मुख्य पीक कमी कालावधीचे असल्यास त्याचे अवशेष जमिनीवर पडून तुरीला उपलब्ध होतात. या आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पावसाचे पाणी संपूर्णपणे तुरीला मिळते. तसेच वाढीला जागा मिळते व मित्र किडींचे प्रमाण वाढून मुख्य पिकातील प्रमुख किडीपासून तूर पिकाचे संरक्षण होते. त्याचप्रमाणे अतिरिक्त उत्पादनही मिळून फायदा होतो.

वाचा:  कंगना राणावतला भेटणारे राज्यपाल शेतकरी पुत्राला भेट देणार का? शेतकरी तरूणाचे पत्र

सध्याच्या परिस्थितीत पाऊसाच्या उघडीप आणि वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे सोयाबीनवर खोड माशी, पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अंडयातून बाहेर निघालेली पाय नसलेली अळी प्रथम सोयाबिनची पाने पोखरून नंतर पानांच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते .परिणामी किडग्रस्त झाड वाळते.या किडींच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या, पानांच्या देठाचा अळीसह नायनाट करावा.

वाचा:  क्युआर कोड स्कॅन करा अन् केळी खा बिनधास्त

या किडींचा प्रादुर्भाव अर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर (10 टक्के किंवा त्यापेक्षा
जास्त) आढळल्यास शिफारसीत साधनांचा योग्य वापर करून सुरक्षित फवारणी करावी. तसेच एकात्मिक किड नियंत्रणाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा. कृषी सहाय्यक गोवर्धन उंडे यांनी निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करावा, याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती देऊन निंबोळी गोळा करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. या सोयाबिन शेती शाळेला कृषी सहाय्यक विजय जाधव, योगेश तहकीक, अंकुश जुमडे, गणेश फिस्के,सावता काळे,भाऊसिंग पवार, प्रवीण पवार, शिवाजी शिंदेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

वाचा:  पणन महामंडळाची 'ही' नवी योजना; शेतमाल वाहतूकीसाठी मिळणार अनुदान

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App