औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला क्विंटलला ४०० ते ७०० रुपयांचा दर

Smiley face < 1 min
कांदा बाजारभाव
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला क्विंटलला ४०० ते ७०० रुपयांचा दर

औरंगाबाद – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (३० जुलै) १ हजार ७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २३ आणि २५ जुलैला ५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला २५० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. २५ जुलैला कांद्याची आवक ६९४ क्विंटल तर दर २०० ते ६५० रुपये प्रति क्‍विंटल राहिला. २६ जुलैला १ हजार ३७७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते ७०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. तर २७ जुलैला १ हजार ७७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते ६५० रुपये प्रति क्‍विंटल राहिले. २८ जुलैला ५५५ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहिले. तर २९ जुलैला १ हजार २० क्विंटल आवक झालेल्या कांद्याला २५० ते ७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता, अशी माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

वाचा:  वायदा बाजार अपडेट १२ ऑगस्ट २०२०: सोयाबीन, हळद, आणि चण्याचे वायदे बाजारभाव !

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App