शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देणाऱ्या बँक व्यवस्थापकांची गय करणार नाही – रविकांत तुपकर

Smiley face < 1 min

ई ग्राम : पिककर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत असताना बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील सहा बँक शाखांना भेटी दिल्या. पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केळवद, चिखली, शेलसूर, अमडापूर, उंद्री या ठिकाणी बँक शाखांना भेटी दिल्या.

विदर्भातील शेतकरी अनेक वर्षांपासून अस्मानी, सुलतानी संकटाचा मारा सहन करीत आहे. त्यातच यावर्षी कोरोना महामारीचा मोठा फटका बसला आहे. उत्पादीत केलेल्या शेतमालाला बाजार उपलब्ध नसल्याने मातीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला. फळ भाज्या तर फेकूनही द्याव्या लागल्या आहेत. कर्जमाफी झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीच्या खर्चासाठी बँकामध्ये गर्दी केली तर बँक मॅनेजरकडून शेतकऱ्यांची छोट्या छोट्या बाबींसाठी अडवणूक केली जात आहे.

egram

चिखली येथील सेंट्रल बँक शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्राचे 100 रुपये भरून घेत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बँक व्यवस्थापकाला धारेवर धरले. दरम्यान वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर नाहरकत प्रमाणपत्राचे पैसे घेणार नसल्याचे सांगितले. उंद्री, अमडापूर, केळवद, चिखली व शेलसुर येथे स्टेट बँकेच्या शाखेत पीककर्ज वाटप अंत्यत धिम्या गतीने सुरू असून जिल्ह्यात कुठेच 100 रुपयांचे मुद्रांक उपलब्ध नसताना उंद्री येथे स्टेट बँक दोन स्टँप पेपरची गरज असताना शेतकऱ्यांना तीन स्टँप पेपर मागत असल्याची बाब समोर आली. बँकेसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पिक प्रकरणे मार्गी न लावल्यास आपण बँकेत येऊन बसू असा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App