केळी लागवडीत अडथळे; पावसाचा परिणाम

Smiley face < 1 min

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीला मध्यंतरी सुरुवात झाली. परंतु गेले पाच-सहा दिवस अधूनमधून जोरदार, मध्यम पाऊस अनेक भागांत येतच आहे. यामुळे केळीचे कंद काढून त्याची लागवड थांबली आहे.

केळी लागवडीसाठी चांगला वाफसा आवश्यक असतो. काळ्या कसदार जमिनीत वाफसाच नाही. रोपे किंवा कंदांचीदेखील लागवड काळ्या कसदार जमिनीत करणे सध्या अशक्य आहे. तसेच केळी लागवडीसाठी अनेक शेतकरी कंदांना पसंती देत आहेत. कंद केळीची काढणी पूर्ण झालेल्या बागांमधून मजुरांकरवी काढावे लागतात. पण पाऊस व वाफसा नसल्याने कंद काढण्याचे कामही थांबले आहे. कंद लागवडीसाठी शेतकऱ्यांनी क्षेत्र मशागत करून तयार केले आहे. सऱ्या पाडल्या आहेत. फक्त केळी लागवड करायची आहे. पण पावसामुळे ही कार्यवाही थांबली आहे.

egram
वाचा:  सांगली जिल्हा बँक निवडणूक जयंत पाटील बिनविरोध करणार?

ऑगस्टच्या अखेरीस पाऊस नव्हता. त्या वेळेस काही शेतकऱ्यांनी लागवड पूर्ण करून घेतली. या आगाप केळीची वाढही जोमात आहे. या केळीत आंतरमशागत आवश्यक आहे. कारण तण वाढले आहे. पण आंतरमशागतीचे कामही ठप्प आहे.

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, भडगाव-पाचोरा, जामनेर, धुळ्यातील शिरपुरात अधिक केली जाते. काळ्या कसदार जमिनी तापी, गिरणा, अनेर नदीकाठी आहेत. या भागात सततचा पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वाफसाच तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाचा:  प्रतिज्ञापत्रात खटले दडविल्याने फडणवीसांच्या अडचणींत वाढ

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे उडीद, सोयाबीन पिके वाया जात असून, हे क्षेत्र रिकामे करून त्यात केळीची लागवड करण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. पण हे नियोजन कोलमडले आहे. कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबरअखेरपर्यंत केली जाते. यामुळे ऑक्टोबरमध्ये लागवडीचे नियोजन काही शेतकरी करीत आहेत.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App