अवघ्या ३० गुंठ्यात तब्बल ४ लाखाचे उत्पादन

Smiley face 2 min

कामटी | फक्त नोकरी करुनच जास्त पैसे कमवता येतात या भारतीय मानसिकतेला छेद देण्याचे काम मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी गावातील तरुणाने केले आहे. त्याचेही स्वप्न पोलीस व्हायचे होते. सरकारी नोकरी करायची होती. भरतीसाठी तयारीही केली मात्र तिथली स्पर्धा अन् गर्दी पाहून निराश झालेल्या तरुणाने यशस्वी शेती करुन दाखवण्याचा जणू मनाशी निश्चयच केला होता. भविष्याचा प्रश्न भेडसावत होता. अशावेळी त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये टरबुजाचे पीक घेण्याचा विचार आला. सेंद्रिय खताचा वापर करुन, ड्रीपने पाणी देऊन अवघ्या ३० गुंठ्यात तब्बल चार लाखांचे टरबुज उत्पादन घेण्याची किमया करुन दाखवली आहे.

बबलू उद्धव देवकते असे या तरुणाचे नाव आहे. तो मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील रहिवासी आहे. त्यालाही पोलिसात नोकरी करायची होती, पण नाकरीतील अपयशाला न कवटाळता यशस्वी शेती करुन दाखवली आहे. सन २००८ ला पोलीस भरतीसाठी गेलेले बबलू स्पर्धा पाहूनच हवालदिल झाले. बेरोजगारी खूप असल्याचे त्यांना या पोलीस भरतीत दिसले. त्याच वेळी त्यांनी पोलीस भरती सोडून शेती करायचं ठरवलं.

वाचा:  कोल्हापूर जिल्ह्याला ‘या’ दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सावधानतेचा इशारा

जानेवारीत ३० गुंठे टरबूज लागवड केली. प्रारंभी त्यांनी या ३० गुंठ्यांत ४० बैलगाड्या एवढे शेणखत टाकले. नंतर शेतीची योग्यरित्या मशागत करून ट्रॅक्टरच्या सहायाने सहा फूट अंतराने सरी सोडून बेड तयार करून घेतले. सिजेंटाच्या ‘बॉबी’ या वाणाची टरबूज रोपांची १:२५ अंतराने नागमोडी पद्धतीने लागवड केली. ३० गुंठ्यांत एकूण ६००० रोपे लावली. प्रति रोप २ रुपये ८० पैसे प्रमाणे विकत घेतले होते.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

वातावरणात वेळोवेळी होणारे बदल आणि पिकांवर येणारी रोगराई याचे प्रमाण वाढल्याने पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. बबलू यांनी या तीस गुंठ्यांत फळमाशी फासे २५, किटक फासे २५ व स्टिकर २५ पिकात लावले आहेत. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले़ केवळ २५ दिवसांत या टरबूज वेलला फळ आले. गेल्या २५ दिवसांत देवकते यांनी या पिकाला केवळ सेंद्रिय खते वापरली आहेत. यापैकी ‘जिवामृत’ची मात्रा फायदेशीर ठरली. देशी गाईचे शेण, ताक, गोमूत्र, गूळ, बेसन व पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून जिवामृत तयार केले. हे मिश्रण ड्रीपमधून व फवारून पिकाला दिले.

वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

तीन लाखांचा निव्वळ नफा
सध्या टरबूजाला ३५-४० रुपये प्रति किलो असा बाजारभाव आहे. अजून चाळीस दिवसांत अंदाजे एकूण २० टन एवढे टरबूज निघाल्यास देवकते यांना ४ लाख उत्पन्न मिळणार ग्राह्य आहे. बाजारपेठेत फक्त २० रुपये प्रति किलो धरले तरी हे उत्पन्न साध्य होणार आहे. लागवड खर्च एक लाख वजा केल्यास ३ लाख उत्पन्न सहज मिळणार आहे.

नोकरीचा विचार सोडून शेती केल्याने जीवनात संसाराचे सोने झाले. आज जर्सी गाई १३, देशी २, कुक्कुटपालन, शेळीपालन व किराणा दुकान यांचा शेतीला जोडधंदा म्हणून आधार मिळाला आहे. अत्यल्प खर्चातून टरबुजाने मोठे बळ दिले आहे.


बबलू देवकते, टरबूज उत्पादक

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App