टीम ई ग्राम – आपल्या घरामध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये लसूण आणि मध यांचा समावेश आहे. आपल्या सगळ्यांना लसणाचे फायदे माहित असतीलच, कारण की आयुर्वेदात लसणाला प्रभावी औषधी मानले जाते. लसूण कितीतरी आजारांवर फायदेशीर उपचार आहे. मधाला संपूर्ण आहारही मानले जाते. याच्या सेवनाने शरिरारतील कमी असलेले पोषण भरून निघतात. जरा विचार करा की, जर तुम्ही या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याला किती फायदा होवू शकतो. या लेखात आपण याच फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

ह्रदयाच्या स्वास्थ्यासाठी लसूण खाणे चांगले असते. लसणाच्या सेवनामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि ह्रदय रोग रोखण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे ह्रदय रोगाचा झटका येण्याचा धोका कमी होतो. याशिवाय उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लसूण खाल्ला तर खूप फायदेमंद असते. बर्याच संशोधनात असे दिसून आले आहे की, लसूण खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होवू शकतो. म्हणून उच्च रक्त दाबाच्या रूग्णांनी दररोज रिकाम्या पोटी काही लसणाच्या पाकळ्या खाव्यात.

मधामध्ये भरपूर प्रमाणात एंजाइम, प्रथिने, खनिजे आणि अमीनो अॅसिड आढळते. मधाचे नियमीत सेवन केल्यामुळे शरिरातील चरबी कमी होण्यास मदत करते. शरिरातील उर्जा वाढविण्यासाठीही मधाचा उपयोग होतो. मधाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यासही लाभकारी आहे. पोटातील गॅस कमी करण्यासाठीही मधाचे सेवन करतात.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.