शेतकऱ्यांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार शेतमाल

Smiley face < 1 min

नागपूर : विदर्भात उत्पादित शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंजनी रेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागासह बांगलादेश पर्यंत या माध्यमातून माल पाठविता येईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विदर्भात उत्पादित शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे हा सक्षम पर्याय ठरू शकतो. त्यादृष्टीने चाचपणी करण्याकरिता आज शुक्रवारी (ता.१४) विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शेतमाल वाहतुकीसाठीच्या विविध पर्यायांची माहिती दिली. रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णांत पाटील, मंडळ प्रबंधक सोमेश कुमार, खासदार विकास महात्मे, टाटा कन्सल्टन्सी राजेश उरकुडे यांच्यासह शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उद्योजक या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

वाचा:  यंदा ऊसाच गाळप वाढणार, कारण...

यावेळी कृष्णांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून कापूस गाठीच्या वाहतुकीबाबत सातत्याने विचारणा होत आहे. त्यासोबतच इतरही शेतीमालाची वाहतूक करता येईल त्यादृष्टीने रेल्वेकडून चाचपणी केली जात आहे. प्रवासी वाहतुकीप्रमाणेच शेतमाल वाहतुकीला देखील प्राधान्य देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या प्रमाणे शेतमाल वाहतुकीकरिता देखील निश्चित वेळ पाळली जाणार आहे. तसा टाईम टेबल आखण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.

वाचा:  सिंधुदुर्ग जिल्हयात पावसाचा जोर ओसरला; पण...

नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने इथून कोणत्याही भागात शेतमाल पाठविणे सोयीचे ठरते. शेतमाल उत्पादकाच्या ठिकाणापासून ते थेट खरेदीदारापर्यंत माल पोचवावा अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने देखील रेल्वे प्रयत्न करीत असून यापूर्वी नागपुरात रेल्वे प्रशासनाने ४० ते ५० टनापर्यंतचा माल थेट खरेदीदारापर्यंत पोहोचविण्याकरता टपाल खात्याची मदत घेतली होती.

दरम्यान, टपाल खात्याच्या वाहनांचा या कामी उपयोग करण्यात आला. तशाच प्रकारच्या साखळीची चाचपणी देखील केली जात आहे. नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीसाठी सध्या रेफ्रिजरेटेड व्हॅन उपलब्ध करणे शक्य नाही. रेल्वेने सध्या काही बोग्यांमधील सीट काढून त्यांचा वापर शेतीमाल वाहतुकीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा:  निर्यातबंदीनंतरही कांदा बाजारात पुन्हा तेजी; मिळतोय 'इतका' भाव

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App