ग्रामपंचायत ध्वजारोहणाबाबत मोठा निर्णय

Smiley face < 1 min

नगर : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबतच्या हालचाली सुरु आहेत. १५ ऑगस्टपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ध्वजारोहण करता येणार नाही, असं ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. सरपंचांऐवजी प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

राज्यात कोरोना संसर्गाचा धोका असल्याने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका न घेता त्याठिकाणी साधारण सहा महिने प्रशासक नियुक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

वाचा:  नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची ‘अशी’ चेष्टा

गाव पातळीवर स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीत सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. नव्याने निवडणूका झाल्या नसल्याने आणि अजूनही प्रशासक नियुक्त न झाल्याने सरपंचपद कायम असले तरी मुदत संपलेल्या गावांमधील सरपंचांला ध्वजारोहण करण्यापासून मुकावे लागणार आहे. कारण ग्रामविकास विभागाने स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत नव्याने सूचना दिल्या आहेत.

चार दिवसात प्रशासक नियुक्त न झाल्यास प्रशासकाच्या हस्ते अथवा स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक अथवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना कळवले आहे.

वाचा:  गुन्हेगार पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाच्या नव्या सूचना; जाणून घ्या...

दरम्यान, ध्वजारोहण करण्यासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची ध्वजारोहणासाठी नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App