काँग्रेस कार्यकारिणीत मोठे ; नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

Smiley face < 1 min

मुंबई – राज्यात काँग्रेसने मोठे फेरबदल केले आहेत. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर नाना पटोले यांनी कालच (दि.४) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस आज पत्रक काढले असून पटोले यांची नियुक्ती केली आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.

सहा कार्यकारी अध्यक्ष
शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

दहा उपाध्यक्ष
शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे, कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, एम एम शेख, माणिक मोतीराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App