रिअल हिरो! ३० वर्षात खोदला ५ किलोमीटर कालवा; बिहारचा मांझी २.०

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – एखाद्या माणसाने जर एका विशिष्ठ हेतूने निर्धार केला तर तो काहीही करू शकतो. याचाच प्रत्यय बिहारमध्ये आला आहे. बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील एका ७० वर्षाच्या वृध्दाने आपल्या गावात शेतीला सिंचनासाठी पाणी आणण्यासाठी सलग ३० वर्षे खोदकाम करून ५ किलोमीटर लांबीचा कालवा खोदला आहे. इमामगंज आणि बांकेबाजारच्या सीमेवरील कोठीलावा गावात राहणाऱ्या लुंगी भुईया या व्यक्तीने हा भीम पराक्रम केला आहे. यानिमित्ताने बिहारमधील ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळख असलेल्या दशरथ मांझीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ज्याने २२ वर्ष आपल्या गावाजवळील डोंगर खोदून रस्ता तयार केला होता.

गावातील पाण्याच्या समस्येमुळे दुष्काळग्रस्त कोठीलावा गावतील तरूणांच्या स्थलांतरामुळे लुंगी दुखी होते. भौगोलिक रचनेमुळे कोठीलावा गावात पावसाचे पाणी साठवता येत नसल्याने हा गाव कायम दुष्काळाच्या छायेत होता. गया शहरापासून ८० किमी अंतरावर असणारे हे गाव चोहोबाजूंनी जंगलाने वेढलेले आहे.

गया में नया 'दशरथ मांझी', 30 साल में बना दी 3 किलोमीटर लंबी नहर ! - new  dashrath manjhi in gaya 3 km long canal built in 30 years

या गावामध्ये शेतीशिवाय इतर कोणतीही रोजगाराची संधी नसल्यामुळे गावातील तरुण मोठ्या संख्येने रोजीरोटीच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झाले. गावातील तरूण रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये स्थलांतरीत झाल्यामुळे गावात फक्त महिला आणि लहान मुलेच राहिली होती. यामुळे लुंगी व्यथित होते.

भुइयां की मेहनत - पहाड़ों से उतरने वाले पानी को खेत तक लाने के लिए 30 साल  में बना डाली तीन किमी की नहर | ET Hindi

कोठीलावा गावाचे प्रमुख विष्णूपंत भोकटा यांनी सांगितले की, लुंगी यांनी गावाजवळच्या जंगलात असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतापासून गावापर्यंत कालवा खोदण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक याठिकाणी आपली गुरेढोरे पाणी पिण्यसाठी नेत असत. पाण्यच्या या नैसर्गिक स्त्रोतामुळे जंगली प्राण्यांची पाण्यासोबतच अन्नाचीही गरज भागत होती. गावकऱ्यांना शेतीला लागणाऱ्या सिंचनासाठी हा पाणीसाठा पुरेसा असल्याचे लुंगी यांना माहित होते. असे असले तरी हे पाणी गावापर्यंत आणणे खूप कठीण काम होते.

गया में नया 'दशरथ मांझी', 30 साल में बना दी 3 किलोमीटर लंबी नहर ! |  24CityNews

हा कालवा खोदण्यासाठी लुंगी यांनी सर्वप्रथम कालवा खोदण्याच्या मार्गाचे सर्वेक्षण केले. त्यानंतर ३० वर्षे अथक परिश्रम करून ४ फूट रूंद आणि ३ फूट खोल कालवा खोदण्यात लुंगी यांना यश आल्याचे भोकटा यांनी सांगितले. दशरथ मांझी प्रमाणेच दररोज कालवा खोदण्यासाठी आपली पारंपारिक उपकरणे घेवून जाताना गावातील लोक त्यांना वेडा म्हणत असत.

लुंगी यांच्या या कामाची दखल घेवून जिल्हा प्रशासन त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. प्रशासनाने या कालव्याला लुंगी कालवा असे नाव दिले आहे. यासोबतच त्यांनी उन्हाळ्यात शेतीच्या सिंचनासाठी आणि घरगुती वापरासाठी एक छोटा तलावही खोदला आहे. ज्याला स्थानिक भाषेत आहर असे म्हणतात.

दरम्यान, बिहारमधीलच दशरथ मांझी या ध्येय वेड्याने आपल्या मुलगावी गेहलौर येथे छन्नी आणि हतोड्याच्या सहाय्याने डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. यासाठी मांझीला २२ वर्षे लागले होते. १९६० पासून १९८२ या बावीस वर्षाच्या कालावधीत मांझीने हा रसता तयार केला होता. त्याच्या या अथक प्रयत्नांमुळे गेहलौर ते वझीरगंज हे ५५ किमीचे अंतर अवघ्या १५ किमी एवढे झाले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App