डेअरी व्यवसाय करणारा इंजिनियर देशात कमावतोय नाव; मोदींनी दिले गुजरातला येण्याचे निमंत्रण

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – माणासाने काम करताना कोणत्याही कामाला कमी लेखू नये. आपल्याला ज्या कामात आनंद मिळेल असेच काम माणसाने करावे. असेच काम काम करून बिहार राज्यातील एका तरूणाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या तरूणाने इंजिनिअरिंगचा अभ्यास केला परंतु त्याने डेअरी व्यवसायात आपले नाव कमावले आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ संवादानंतर हा तरूण कोट्यावधी तरुणांसाठी रोल मॉडेल बनला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून बिहारमधील डेअरी उद्योग आणि मत्स्य पालन उद्योगाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी संवाद साधला. या संवादामध्ये बिहारमधील बरौनी येथे राहणाऱ्या ब्रिजेश कुमार याचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या तरूणाची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर चालणाऱ्या ब्रिजेश कुमार याचे मोदी यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले. मोदींनी त्याचे कौतुक करताना म्हटले की तुमच्या सारख्या तरूणांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तरूणाला गुजरातला येण्याचे निमंत्रण दिले आणि म्हणाले की, तेथील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थेच्या यशस्वी योजना पहा.

वाचा:  नुकसानग्रस्तांसाठी मिळाले ‘इतके’ कोटी रुपये

ब्रिजेश २०१३ पासून पशुपालनाचा व्यवसाय करत असून तो ३० वर्षांचा तरूण आहे. २०१० मध्ये त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, पहिल्यापसूनच काही तरी वेगळे करण्याची त्याची इच्छा होती. २०१३ ला त्याने डेअरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ब्रिजेशने सुरुवातीला सुमारे दोन डझन सहिवाल आणि जर्सी जातीच्या गायींपासून डेअरीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला या गायींपासून १३० लिटर दुध मिळत होते. हळूहळू डेअरीच्या व्यवसायात त्याचा जम बसत गेला. डेअरी व्यवसायातील त्याने मिळविलेल्या अनुभवाच्या जोरावर तो राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळ गुजरातच्या मार्गदर्शनाखाली इतर शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्याचे काम करू लागला.

वाचा:  ‘वेळेत पीक कर्ज फेडणाऱ्यांना परतावा’

उत्पन्न वाढीसाठी गांडूळ खताची निर्मीती –
कृषी क्षेत्रात ब्रिजेश कुमार २०१७ पासून काम करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी तो गांडूळ खत निर्मीतीही करत आहे. ब्रिजेशच्या म्हणण्यानुसार जनावरांना रोग आणि इतर प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना मोकळ्या जागेत ठेवले पाहिजे. गोशाळेत स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्याकडेही शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.

वाचा:  केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे - हंसराज अहीर

गोपालनासाठी ब्रिजेशला पुरस्कारही मिळाले आहेत –
बेगूसराय डीएम यांच्या हस्ते शेतकरी पुरस्कार
पशु आणि मत्स्यव्यवसाय विभाग, बिहार सरकारचा पहिला प्रगतिशील शेतकरी पुरस्कार
राष्ट्रीय पशु विकास योजनेंतर्गत पशु मेळाव्यात द्वितीय पारितोषिक
डॉ. राजेंद्र प्रसाद मध्यवर्ती विद्यापीठाचा अभिनव शेतकरी पुरस्कार
माजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते २०१८ मध्ये सन्मानित

दरम्यान, दुग्ध व्यवसायासाठी सरकार बर्‍याच प्रकारच्या योजना राबवते, ज्याचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App