अर्थसंकल्प २०२१ : अर्थसंकल्प आज सादर होणार; अर्थमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम :  महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. कोरोनाशी मुकाबला करत असता अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काल संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. ही चर्चा झाल्यानतंर या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचे स्पष्ट झाले आहे.

egram

दरम्यान, मागील एक वर्षापासून राज्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतूदी करण्यात आलेल्या आहेत, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App