कृषी यंत्रांसाठी केंद्र सरकार देतयं १०० टक्के अनुदान; काय आहे योजना? वाचा…

Smiley face 2 min

टीम ई ग्राम – आधुनिक भारताचा शेतकरीसुध्दा आता आधुनिक शेती करत आहे. नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी शेती करत आहे. भारताची ओळखच मुळातच कृषी प्रधान देश अशी आहे. मात्र, देशातील अजून बरेच शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करण्यावर भर देतात. त्याचाच परिणाम त्यांच्या शेती उत्पन्नावर होतो. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून मात्र, शेतकरी शेतीच्या कामासाठी पारंपारीक औजारांऐवजी यंत्रांचा आणि अद्ययावत कृषी औजारांचा वापर करत आहे. परंतू जवळ पुरेसा पैसा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने शेती करता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने योजना आणली असून कृषी यंत्रांवर १०० टक्के अनुदान देत आहे. त्यामुळे आता देशातील शेतकरी यंत्रांच्या माध्यमाने आधुनिक शेती करून भरघोस उत्पन्न मिळवेल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मोदी सरकार विविध योजना राबवत आहे. याच प्रमाणे केंद्र सरकार आता शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्र भाडे तत्वावर देत आहे. यासाठी सरकारने पूर्ण देशभरात ४२ हजार कस्टम हायरिंग सेंटर सुरू केले आहेत. या केंद्रातून शेतकरी भाड्याने कृषी अवजारे शेतीच्या कामासाठी घेऊ शकतो. दरम्यान कस्टम हायरिंग सेंटर उघडण्यासाठी एक रुपया देखील घेतला जात नाही.

कृषी यंत्रावर १०० टक्के अनुदान –
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यासाठी सरकारने काही मागास राज्यांसाठी सरकारने एक पाऊल उचलत कृषी अवजारांवर १०० टक्के अनुदान देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. जर एखद्या शेतकऱ्याला कस्टम हायरिंग सेंटर सुरू करायचे असेल तर त्यांना एकही रुपयांची गुंतवणूक करावी लागणार नाही.

कृषी यांत्रिकीकरण सबमिशन योजना म्हणजे काय? –
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. ते म्हणजे कृषी यांत्रिकीकरण सबमिशन नावाची योजना. या सरकारी योजनेंतर्गत नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणार्‍या मशीन्स आता सहज मिळतील. शेती यांत्रिकीकरण सबमिशन योजना आधुनिक शेती यंत्रणादेखील उपलब्ध करुन देते. जसे की लँड लेव्हलर, शून्य पर्यंत बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र, आनंदी बियाणे, मल्चर इ. यामुळे केवळ शेती सुलभ होत नाही तर उत्पादनही वाढते आणि उत्पन्न दुप्पट होते.

कृषी यंत्रासाठी अर्ज कसा करावा? –
जर एखाद्या शेतकर्‍याला शेती औजारांवर अनुदानासाठी अर्ज करायचा असेल तर सीएससी केंद्रात (कॉमन सर्व्हिस सेंटर) अर्ज करू शकतात.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App