मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार; हवामानात मोठा बदल

Smiley face < 1 min

पुणे – पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बुधवारपासून (१६ सप्टें.) पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान अजूनही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्राचा ईशान्य भाग आणि दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचे पट्टा असून अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यंत सक्रिय असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे.

वाचा:  अधिकारी साखर झोपेत तेव्हा अजित पवार फिल्डवर; ६ वाजताच केली मेट्रोच्या कामाची पाहणी

बंगाल उपसागराच्या पश्चिममध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात असलेला मान्सूनचा पट्टा बिकानेर, जयपूर, सागर, दुर्ग, जगदलपूर आणि दक्षिण – आग्नेय ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरापर्यंत आहे. उत्तर प्रदेशच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

वाचा:  पणन महामंडळाची 'ही' नवी योजना; शेतमाल वाहतूकीसाठी मिळणार अनुदान

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App