कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

Smiley face < 1 min

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र पावसाला पोषक हवामान असल्याने आज आणि उद्या (दि.27) रोजी राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

काल मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर कोकणात अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती.

वाचा:  पुणे शहरालगतच्या २३ ग्रामपंचायतींमध्ये कडक टाळेबंदी

राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून पाकिस्तान आणि बिहारपर्यंत विस्तारला आहे. तर बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने बिहार, आसाम, मेघालयासह पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगाली, लातूर, नांदेड, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वाचा:  पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App