कोकणात जोरदार पावसाची शक्यता; उत्तर भारतात मान्सूनचा प्रवास मंदावला

Smiley face < 1 min

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. आज (ता.२३) आणि उद्या (ता.२४) कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी होऊ लागल्याने कोकणातील पावसाचा प्रभाव काहीसा कमी होण्याची स्थिती आहे. तर फिरोजपूर, रोहतक, अलिगड, चुर्क, रांची बालासोर या भागात मॉन्सूनचा ट्रफ असून, बंगाल उपसागराच्या वायव्य भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. ही पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

egram
वाचा:  गुजरातमध्ये 'भूपेंद्र' पर्वाला सुरुवात

मान्सूनचा प्रवास मंदावला
गेल्या दोन दिवसापासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रवास उत्तर भारतात मंदावला आहे. मंगळवारी मॉन्सूनच्या प्रवासात फारशी प्रगती झाली नसल्याचे मॉन्सून जैसे थे आहे. त्यातच पुढे सरकण्यासाठी पुरेसे पोषक हवामान नसल्याने पुढील प्रवास संथगतीने सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल वातावरणीय स्थिती नसल्याने मॉन्सूनचा पुढची वाटचाल अडखळली आहे. शनिवारी (ता.१९) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग, तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली होती. बारमेर, भिलवाडा, अलिगड, आंबाला, अमृतसरपर्यंतच्या भागात मॉन्सूनने मजल मारली होती. राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी धिम्यागतीने होणार आहे.

वाचा:  मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App