राज्याच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामानात अचानक बदल

Smiley face < 1 min

पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.१८) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात मुख्यत: उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, फालोदी, अजमेर, ठळक कमी दाब क्षेत्र, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

egram
वाचा:  पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी शेतकऱ्यांचे उभे पीक कापले

दरम्यान, राज्यात दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडिपीमुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. उद्यापासून (ता. १८) पावसाला पोषक हवामान होत असून, रविवारपासून (ता. १९) विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : देवगड, दोडामार्ग, पेडणे, ठाणे, उल्हासनगर प्रत्येकी १०
मध्य महाराष्ट्र : तळोदा १०
विदर्भ : देवरी, कोर्ची, सालकेसा प्रत्येकी ४०, अर्जूनी मोरगाव, देसाईगंज, कुरखेडा, लाखंदूर, नागभीड, नागपूर, सडक अर्जूनी, साकोली प्रत्येकी ३०. बाभूळगाव, चांदूरबाजार, चिखलदरा, गोरेगाव, करंजालाड, लाखनी, मोर्शी प्रत्येकी २०.

वाचा:  हातकणंगलेत रब्बी क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढवणार; तालुका कृषी विभागाचे उद्दिष्ट

कमी दाबाचे क्षेत्र निवळण्याचे संकेत
वायव्य मध्य प्रदेश आणि नैर्ऋत्य उत्तर प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून (ता.१८) ही प्रणाली निवळण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, उद्या ही प्रणाली ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App