मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासनाकडून अलर्ट

Smiley face < 1 min

नांदेड : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात  २२ व २३ जुलै या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत पुढीलप्रमाणे आवाहन. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.

egram
वाचा:  सरकारला शहाणपण सुचले पण उशिरा : देवेंद्र फडणवीस

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

वाचा:  पुणे जिल्ह्यातील ‘या’ सतरा धरणांतून पाण्याचा विसर्ग

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.

वाचा:  पीक पेरा नोंदणीला प्रतिसाद कमीच

दरम्यान, उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोर्‍याजवळ उभे टाकू नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App