राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; हवामानात अचानक मोठे बदल

Smiley face < 1 min

पुणे : विदर्भाच्या काही भागात वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी अंशत ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. उद्यापासून (बुधवार) पुढील तीन ते चार दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला.

उत्तर भारतात राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच मेघालय व परिसरातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाना, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मिर, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, अरूणाचलप्रदेश, पश्चिम बंगाल या भागात पाऊस पडत आहे. त्याचा काही अंशी परिणाम विदर्भाच्या व उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागावर होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमी अधिक स्वरूपात थंडी आहे.

egram

कोकण व मराठवाडा भागात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा जवळपास आहे. काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे.

सध्या राज्यातील अनेक भागात थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. काढता पाय घेण्यास सुरूवात केली आहे. थंडी कमी होत असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. विदर्भातील सर्वच भागात उन्हाच्या झळा तिव्र होऊ लागल्या आहेत. आज विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सरासरीच्या तुलनेत ५.३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन सर्वाधिक कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर अमरावती, बुलडाणा, वर्धा गोंदिया, नागपूर, वाशिम या भागात ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.

दरम्यान, मराठवाड्यातही कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मालेगाव, जळगाव या भागात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यत गेले आहे. कोकणात उन्हाच्या झळा वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली असून कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअसपर्यत गेले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App