‘चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत’

Smiley face < 1 min

टीम ई ग्राम – महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल आजरा येथे झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार ग्रामविकासमंत्र्यांनी घेतला.

वाचा:  कोकणात जोरदार पाऊस, पण ‘या’ जिल्ह्यात मात्र प्रतीक्षा कायम

बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या आणि दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केलं आहे. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

वाचा:  हळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्दची कार्यवाही

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच पण कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही, असा टोलाही ग्रामविकासमंत्र्यांनी मारला आहे.

वाचा:  केंद्र सरकार पूरस्थितीतून सावरण्यासाठी राज्याला करणार 'ही' मोठी मदत

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचे दिसून आले. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पाटील यांनी या केलेल्या टीकेला ग्रामविकासमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App