‘या’ जिल्ह्यात देशातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Smiley face < 1 min

पुणे : एप्रिल महिना सुरू झाल्याने विदर्भातील कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. येत्या काळात ऊन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात आखणी वाढ होईल. आज शु्क्रवारी (ता.२) चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.

egram
वाचा:  खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची कोंडी; शेतकऱ्यांना मोठा फटका

विदर्भात गोंदिया, बुलडाणा वगळता सर्वच भागात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे. मराठवाड्यातही उन्हाच्या झळा तीव्र होत आहे. औरंगाबाद भागात तापमानात काहिशी घट असली तरी उर्वरित भागात कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कमीअधिक स्वरूपात आहे. सोलापूरमध्ये ४०.२ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले असून इतर पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव भागात कमाल तापमान ३१ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. कोकणातही उन्हाचा काहिसा कमी असल्याने कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

वाचा:  फक्त १ रूपयात मिळणार घर; योगी सरकारची मोठी योजना

राज्यात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. उच्चांकी तापमान नोंदविलेल्या चंद्रपूर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे १.३ अंश सेल्सिअसने घट होऊन पुणे येथे १६.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर नागपूर येथे सरासरीच्या तुलनेत ४.२ अंश सेल्सिअसने घट २६.३ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले.

वाचा:  द्राक्ष उत्पादकांची अवकाळीच्या सावटामुळे धाकधूक वाढली
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App