चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचे शेतकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन


ई ग्राम : देशातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचार बंदी चालू असली तरी जीवनावश्यक्य गोष्टींना या मधून वगळलेले असल्याने शेतमालाची खरेदी विक्री चालूच राहणार असून देशातील शहरी भागाला अन्नधान्य , दूध, भाजीपाला पुरवठा चालूच राहणार आहे. शेतमाल खरेदी विक्री चालू ठेवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून शेतकर्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याचाच भाग म्हणून चांदवड बाजार समितीने येणाऱ्या शेतकऱ्यांना आचार संहितेचे पालन करून व्यापार सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातुन बाजार समिती आवारावर शेतीमाल विक्रीसाठी आणलेनंतर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आप-आपल्या तोंडाला रुमाल बांधून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे व आप-आपल्या वाहनांजवळच उभे राहन्याचे आदेश देण्यात आले आहात. तसेच लिलावाचे वेळी अनावश्यक गर्दी करू नये, बाजार आवारात देखील कोणीही समुह करुन फिरू नये, किंवा एकत्रित येऊन गर्दी करु नये. व बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी माहितीसाठी संपर्क 02556-253283

Read Previous

कोरोनाला रोखण्यासाठी अशी घ्या काळजी – पोलीस अधिकारी

Read Next

पोलिसांची दादागिरी; थेट पत्रकारालाच केली मारहाण