मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद; पहा महत्वाचे मुद्दे

Smiley face 2 min

ई ग्राम : आज सर्वत्र अक्षय्य तृतीया, बसवेश्वरांची जयंती आणि रमजान सारख्या सणांसाठी प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचे संकट कोणालाच अपेक्षित नव्हते मात्र आता ही लढाई आपण लढत आहोत. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस हवालदारांचे निधन झाल्याने महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सर्व धर्मियांचे आभार मानत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देशकर्तव्याला सलाम केला आहे.

पोलीस आपल्यासाठी अहोरात्र उभे आहेत त्यामुळे ते आपल्यासाठीच काम करत असल्याचे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. लॉकडाउनचा उपयोग हा कोरोनाची लढाई लढण्यात आपण यशस्वी ठरत असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पुढे काय करणार यावर प्रकाश टाकला..पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे .

वाचा:  बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा; नुकसानीचे पंचनामे सुरू
 • हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. पण ही लढाई आपण लढतोय. आपापले धार्मिक सण, उत्सव बाजूला ठेवून माणुसकीच्या धर्माला प्राधान्य दिल्याबद्दल सर्व धर्मियांचे आभार मानायला हवे.
 • मुस्लीम धर्मियांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, मस्जिद किंवा रस्त्यावर नमाज पठण करण्यासाठी गर्दी करू नका.
 • जे संयम पाळताय त्यातच देव आहे. आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे. डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि पोलिसांमध्ये देव आहे. आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं आहे
 • भाषणादरम्यान करोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
 • लॉकडाऊनमुळे आपण करोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत
 • मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. कारण, प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले होते की, मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे. केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत.
 • केंद्राचं पथक मुंबईत मुक्कामी आहे. केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती
 • सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
 • सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा
 • महाराष्ट्रात १ लाख ८९७२ चाचण्या, त्यापैकी १ लाख ११६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापैकी ७६२८ इतके जण पॉझिटिव्ह रुग्ण, तर ३२३ मृत्यू.
 • कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फळफळावळ विक्रीवर बंधन नाहीत. काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योगांना परवानगी दिली आहे. हे संकट पूर्ण दुर्लक्षित न करता हळू हळू पूर्वपदाच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत करोनावर औषध येण्याधीच आपला देश आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर हे युद्ध नक्की जिंकेल.
वाचा:  'या' राज्यांमध्ये सरकारी धान्यांची खरेदी केली कमी; कारण...

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या वेळी जनतेला केले आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घेत त्यासंबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे. आपला विश्वास आणि आपले आशिर्वाद हेच आमचे बळ असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

वाचा:  कृषीयंत्रांच्या वापरात लक्षणीय वाढ, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App