मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनातील इच्छा बोलून दाखवली असेल – देवेंद्र फडणवीस

Smiley face < 1 min

औरंगाबाद :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपला उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर राज्यात पुन्हा भाजप- शिवसेना युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, की “आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

egram
वाचा:  प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात; राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत.

मुख्यमंत्री ठाकरे नेमकं काय म्हणाले?
ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”.  भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं.

वाचा:  विदर्भातील पाच जिल्ह्यांत ‘इतक्या’ हेक्‍टरने रब्बी क्षेत्र वाढणार

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी ठाकरे म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App