पुणे जिल्हयात ढगाळ हवामानाची स्थिती

Smiley face < 1 min
हवामान
पुणे जिल्हयात ढगाळ हवामानाची स्थिती

पुणे – गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्हयातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होत असला तरी अनेक ठिकाणी पावासाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिके काही प्रमाणात सुकत असल्याची स्थिती आहे.

अरबी समुद्राकडून बाष्प येत असल्याने राज्यासह, पुणे जिल्हयात ढगाळ हवामान आहे. पावसाने उघडीप दिल्याने पुणे जिल्हयाच्या पश्चिम पट्यात भात लागवडी रखडल्याची स्थिती आहे. मात्र, भात रोपे वाढीच्या अवस्थेत असल्याने लागवडी योग्य तयार झाली आहे. पाऊस नसल्याने लागवडी वेळेवर होतील की नाही यांची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

वाचा:  पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, 'या' भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

पूर्व पट्यातही पीके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यासाठी पावसाची गरज आहे. परंतू पाऊस नसल्याने काही ठिकाणी पीके सुकत असून पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हवेली तालुक्यातील थेऊर येथे 5.5 मिमी पाऊस झाला असल्याची नोंद गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झाली आहे. तर केशवनगर, हडपसर, वाघोली परिसरातही हलका पाऊस पडला.

मुळशी तालुक्यातील पौड, मावळमधील कार्ला, खडकाळा, लोणावळा येथेही हलका पाऊस पडला. जुन्नरमधील बेल्हा येथे 12.0 मिमी पाऊस पडला असून वडगाव आनंद, निमूलगाव, डिंगोरे, शिरूर तालुक्यातील पाबळ, कोरेगाव येथेही पावसाचा शिडकावा झाला.

वाचा:  पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, 'या' भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

बारामती तालुक्यातील लोणी 13.8, पणदरे 5.5 मिमी तर बारामती, माळेगाव, मोरगाव येथेही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. इंदापूर तालुक्यातील निमगाव 38.5 मिमी पाऊस पडला. तर सणसर, भिगवण, इंदापूर, लोणी, अंथुर्णे येथेही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दौंडमधील यवतमध्ये 25.3 मिमी पाऊस पडला असून देऊळगाव, केडगाव, राहू, वरंवड, रावणगाव, पुरंदर तालु्क्यातील सासवड येथेही पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

वाचा:  पुढील ५ दिवस असणार अस्मानी संकट, 'या' भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App