राज्याच्या ‘या’ भागात ढगाळ वातावरण; हवामानात वेगाने मोठे बदल

Smiley face < 1 min

पुणे : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्याचा परिणाम कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडी कमी राहिल. आज मंगळवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात येथे १२.१ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

वाचा:  सावधान! आता महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयांत तोडफोड केल्यास थेट कारावास

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत हवामान निरभ्र झाले आहे. मात्र, उत्तर केरळ आणि अरबी समुद्राच्या काही भागांत अजूनही चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय भागात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर उत्तर केरळात ५.८ किलोमीटर उंचीवर आहे.

एक ते दोन दिवसांत ही स्थिती निवळून राज्यात पुन्हा काही प्रमाणात थंडी परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्यावर गेले आहे.

वाचा:  ‘शासकीय धान खरेदीला मुदतवाढ द्या’
https://twitter.com/Agrowonegram/status/1363476234626363393

सध्या कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागात थंडी चांगलीच कमी झाली असून किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव या भागांत थंडीचा प्रभाव कायम आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली भागात थंडी कमी असल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.

वाचा:  कांदा दरात मोठी घसरण; उत्पादकांना फटका

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात जवळपास सर्वच भागात थंडी कायम आहे. त्यामुळे भागात १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App