राज्यातील थंडीत चढउतार सुरूच; हवामान खात्याची माहिती

Smiley face < 1 min

पुणे : अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती मागील पाच ते सहा दिवसापासून कायम आहे. राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून थंडीत चांगलेच चढउतार होत आहे. येत्या पाच ते सहा दिवसात थंडी कमीअधिक स्वरूपात राहिल. आज शनिवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १०.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सागितले.

बंगाल उपसागराच्या नैऋत्य भागात आणि श्रीलंकेच्या उत्तर किनारपट्टीजवळ चक्रिय स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अरबी समुद्राच्या परिसरातही समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर चक्रिय वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यातच राज्यातील हवेत अससेले बाष्प हे चक्रिवादळाने ओढून घेतल्याने राज्यात कोरडे हवामान झाले आहे.

egram

राज्यातील काही भागात थंडी कायम असली तरी हळूहळू ही थंडी कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यासोबत सकाळपासून उन्हाचा चटका काहीसा वाढू लागला आहे. राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढू लागल्याने किमान तापमानारबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली असून किमान तापमानाचा पारा निफाड वगळता १३ अंश सेल्सिअसच्या वर सरकला आहे.

मार्च महिना सुरू होत असल्याने विदर्भात काही ठिकाणी किंचित थंडी आहे. अमरावती, बुलडाणा या ठिकाणचा पारा २० अंश सेल्सिअसच्यावर सरकला आहे. मराठवाड्यातही थंडी कमी होऊ लागल्याने किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. या भागात किमान तापमान १३ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. कोकणात थंडीचा पारा कमी होऊ लागला असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमान या भागात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App