मोदी सरकारला धोरण लकवा झालायं; काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन

Smiley face < 1 min

मुंबई – जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही निर्यातबंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करून केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेस बुधवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

वाचा:  पावसामुळे डाळींब, सीताफळाची आवक घटली; बाजारात मंदी कायम

मंत्री थोरात म्हणाले, की तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला? त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करु शकत नाहीत, नरेंद्र मोदी सरकारला धोरण लकवा झालेला आहे. पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या वल्गना करतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नुकसान करणारे निर्णय घेतात. यातून शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमी भाव देणार, शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करणार या मोदी सरकारच्या फक्त वल्गनाच आहेत, हे पुन्हा दिसून येत आहे.

वाचा:  केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेला धोका; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

आशा धुळीस मिळाल्या –
आधीच जवळपास ५० टक्के कांदा सडल्याने नुकसान झालेले आहे परंतु दरवाढ होत असल्याचे आशादायी चित्र बाजारात दिसत असताना मोदी सरकारच्या या लहरी आणि मनमानी कारभाराने शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. पंतप्रधानांनी तत्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांदा निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना चार पैसे जादा कसे मिळतील हे पहावे, असे मंत्री थोरात म्हणाले.

वाचा:  साखर कारखान्यांचे अद्यापही शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचे देणे

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App