शेतकऱ्यांना दिलासा! सीसीआयला कापूस खरेदी करण्यास परवानगी

Smiley face < 1 min

अकोला : भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मूर्तिजापूर येथील बाजार समिती आवारात सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता आजपासून (दि.११) नोंदणी करता येणार आहे. तर (दि.१२) रोजीपासून प्रत्यक्ष खरेदी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल पाहून हे केंद्र सुरू करण्याबाबत पालकमंत्री बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व आमदार हरिष पिंपळे यांनी पाठपुरावा केला होता. या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होण्याच्या दृष्टीने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी आमदार पिंपळे यांनी केली होती.

egram
वाचा:  ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ मोहिमेला मोठा प्रतिसाद; दुग्धविकासमंत्री, मुख्यमंत्र्यांनाही पाठविली हजारो पत्रे

दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नितीन पाठक मो. ९४०५१५३२५६, श्रीमती गावंडे मो. ७०३८६९२४४७ यांच्याशी संपर्क करून ही नोंदणी फोनवरुन करावी. नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन बाजार समितीला करण्यात आले आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App