लोकांनी टाळ्या वाजवल्याने आणि दिवे लावल्याने कोरोना संकट कमी होणार नाही

Smiley face < 1 min

नवी दिल्ली । देशात कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत, असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. टाळ्या वाजवून, दिवे आणि टॉर्च पेटवून कोरोना पळणार नाही, अशा आशयाचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

भारतात पुरेशा चाचण्या होत नाहीत
कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात पुरेशा चाचण्या केल्या जात नाहीत. नागरिकांना टाळ्या वाजवण्याचं आणि दिवे लावण्याचं आवाहन करून कोरोनाचे संकट दूर होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

वाचा:  बारामतीत सापडला कोरोनाचा १४ वा रुग्ण; रुग्ण पुण्याहून घरी परतलेला

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात २२ मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व कर्मचारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं. यानंतर उद्या रात्री म्हणजे ५ एप्रिलला ९ वाजात ९ मिनिटं घरातील लाइट बंद करून नागरिकांनी मेणबत्ती, मोबाइलचा प्लॅश लाइट, टॉर्च किंवा दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

वाचा:  बारामतीत सापडला कोरोनाचा १४ वा रुग्ण; रुग्ण पुण्याहून घरी परतलेला

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App