अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत झाले २२०० मृत्यू!

Smiley face < 1 min

ई ग्राम : चीनमधून फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर संकट ओढावलं आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे जगभरातील २ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण बळी पडले आहेत. अमेरिकेत कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत जवळपास २ हजार २०० जणांहून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे १ लाख ४२ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वाचा:  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राहणार बंद

न्यू यॉर्क शहराला कोरोनाने आपल्या विळख्यात अडकवले आहे. या एकट्या शहरात कोरोनाचे २३ हजार १४४ बळी गेले आहेत. जवळपास २ कोटी इतकी या शहराची लोकसंख्या असल्याने त्यात ही स्थिती सांभाळणे हे मोठे संकट होऊन गेले आहे. परिस्थिती इतकी भीषण झालीये की शहरातील काही हॉस्पिटलच्या शवघरात मृत रुग्णांचे शव ठेवण्याची सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही असे म्हंटले जात आहे.

egram
वाचा:  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राहणार बंद

अमेरिके पाठोपाठ इटलीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बळी पडले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत २७ हजार ३५९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख १ हजार ५०५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर स्पेन, फ्रान्स, ब्रिटन देशात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचा:  पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राहणार बंद

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ही आज घडीला, ३१ लाख १६ हजार ३९० इतकी मोठी आहे तर आतापर्यंत जगभरात २ लाख १७ हजार १५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या जागतिक महामारीशी जगातील २०० देश लढत आहेत. भारतात सुद्धा परिस्थिती हळूहळू गंभीर होत आहे, भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ३१ हजार ३३२ वर पोहचली आहे.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App