आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; आळंदी, देहू संस्थानांनी दिला ‘हा’ प्रस्ताव

Smiley face < 1 min

ई ग्राम : आषाढी वारीची परंपरा खंडीत न करता मोजक्याच वारकऱ्यांसमवेत पालखी पंढरपूरला नेऊ, दिंड्या-पताका मिरवणार नाही किंवा वाखरी ते पंढरपूर असा एकच दिवसाचा पायी प्रवास करू असे प्रस्ताव आळंदी आणि देहू संस्थांनांनी राज्य सरकारला सादर केले आहेत. शासन निर्णयाच्या अधीन राहूनच पालखी सोहळा साजरा करू, अशी ग्वाही विश्वस्तांनी दिली आहे.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत ३० मे रोजी निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्या अनुशंगाने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी राज्य सरकारला नवे प्रस्ताव सादर केले आहेत. नियम आणि अटींना अधीन राहून पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी, असे यात स्पष्ट केले आहे.

egram
वाचा:  राज्यात तापमान वाढण्याची शक्यता; वातावरणात बदल

दरम्यान, आषाढी वारीचे यंदाचे स्वरुप कसे असावे, याबाबत देहू आणि आळंदी संस्थानांचे प्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, मालक, चोपदार, प्रमुख दिंडीकरी, विणेकरी यांच्यातील बैठकांचे सत्र चालूच आहे. संचारबंदी कायम राहिल्यास आणि नियम शिथिल झाल्यास सोहळा कसा आयोजित केला जाईल, या दोन्ही बाजूंचा साकल्याने विचार केला जात आहे. मानवजातीचे हित नजरेसमोर ठेवून आणि संत वचनाला अनुसरूनच सोहळ्याचे नियोजन केले जाईल, याबाबत एकमत दिसून येत आहे. त्यामुळे शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा:  ‘शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन गारपीट, वादळाबाबत विमा हप्ते भरावेत’

प्रस्तावातील ठळक मुद्दे
पालखी सोहळा मोजक्याच वारकऱ्यांसोबत व्हावा.
पालखीने अतिशय साध्या पद्धतीने प्रस्थान ठेवावे
सोहळा वाटेत कोठेही दर्शनासाठी थांबणार नाही.
प्रस्थान मंदिरांमध्ये होऊन पालख्या येथेच थांबतील.
दशमीच्या दिवशी पादुका पंढरपूरला नेण्यात येतील.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App