बटाटा उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; हातचा घास हिरावला

Smiley face < 1 min

पुणे : कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे. बटाटा काढणी खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कोरोना संकटाने मजूरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे बटाटे पावसामुळे शेतातच सडू लागले आहेत.

वाचा:  पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजे संतापले

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने वाढणारे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने निर्यात बंदी लागू केली असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट आहे.

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान आपल्याला परवडणारे नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

वाचा:  कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरसावले; केंद्राला पत्र पाठवत म्हणाले...

दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बटाटा पिकाच्या खर्चामध्ये तिप्पट वाढ झाली असुन एकरी खर्च लाखाच्या घरात गेला आहे. लागवड केल्यानंतर पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बटाटा शेतात सडला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App